जळगाव। बाविस्कर दाम्पत्याची 23 लाखात फसवुणक करण्यात आली होती. त्याप्रकरणी चार जणांविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून यातील रविंद्र भानुदास चौधरी या संशयिताने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी न्यायाधीश दरेकर यांच्या न्यायालयात कामकाज होवून तो अटकपूर्व न्यायालयाने फेटाळून लावला आहे.स्वप्नाली अनिल बाविस्कर व पती अनील बाविस्कर या दाम्पत्याची अक्षय गृहनिर्माण सोसायटी आहे. संस्थेच्या मालकीचा अव्हाणे शिवारात प्लॉटनं. 13 ते 20 ब्लॉक नऊ खरेदीदाराने विकत घेतली आहे.
या प्रकरणात खरेदी खत नोंदवतांना संशयितांनी संस्थेत कुठलाही पदाधिकारी नसतांना 7/12 उतार्यात एकमेव मालक दाखवुन विक्री केला आहे. हि बाब मुळ मालक संस्थाध्यक्ष यांनी रितसर काढलेल्या उतर्यावर संस्थेने कर्ज घेतल्याचे आढळून आली. या मिळकतीवर 1 कोटी 73 लाख 31 हजार 50 रुपये प्रशासनाचा बोझा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर 1 एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील रविंद्र भानुदास चौधरी या संशयिताने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्या. जे.पी.दरेकर यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज बुधवारी कामकाज होवून न्या. दरेकर यांनी संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.