फसवणूक प्रकरणी दोघा आरोपींना पोलिस कोठडी

0

यावल- अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना पंचायत समिती तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयात मिळणारे शेती साहित्य निम्मे किंमतीत देणार म्हणून पैसे उकळणार्‍या परसाडे येथे तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयाने आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मुबारक नबाब तडवी, मुराद बाबू तडवी व शाबीरा मुबारक तडवी (सर्व रा.परसाडे) यांच्याविरुद्ध एक लाख आठ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. फिर्यादी व साक्षीदारांनी पैशांबाबत तगादा लावल्यानंतर संशयीतांनी उलट त्यांना शिविगाळ करून दमदाटी केली. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी मुराद बाबू तडवी व शाबीरा मुबारक तडवी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर या गुन्ह्यात संशयीत आरोपी वाढण्याचीही शक्यता आहे. तपास पोलिस निरिक्षक डी.के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार गोरख करीत आहेत.