फसवणूक प्रकरणी सावदा पोलिस स्थानकासमोर सानिया कादरींचे उपोषण

0

सावदा । सावदा येथील एका प्रतिथयश केळी व्यापारी तथा ट्रान्सपोर्ट चालक यांचे कडून सुमारे 2 कोटी 81 लाखांची फसवणूक झाली असून या प्रकरणी सदर व्यापारी व त्यांचे वडील या दोघांविरुद्ध सावदा पोलिस ठाण्याला सबळ पुरावे दिले असून त्यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशा मागणीसाठी सानिया कादरी ह्या सावदा पोलिस ठाण्यासमोर गुरूवारी उपोषणासाठी बसल्या आहेत.

बाजार भावाप्रमाणे अद्याप रक्कम शेतकर्‍यांना अदा केली नसल्याचा आरोप
ट्रान्सपोर्ट चालक व व्यापारी मयूर खंडेलवाल व कैलास खंडेलवाल यांना 25 एप्रिल दरम्यान फोन करून आम्ही केळी व्यापार करतो आम्ही सदर माल इतर व्यापार्‍यांना विकू व शेतकर्‍यांना रास्त बाजार भाव देऊ असे सांगितले, शेतकर्‍यांना बाजार भाव देण्यास तयार झाल्याने शेतकरी त्यांना केळी विकण्यास तयार झाले, काही दिवस शेतकरी व खंडेलवाल यांचेत व्यवहार झाला. मात्र, 8 टे 10 दिवस व्यवहार झाल्यावर सुरवातीस त्यांनी ठरल्या भाव प्रमाणे शेतकर्‍यांना पैसे दिले सदर व्यवहार 24 एप्रिल 2017 ते 18 जून 2017 दरम्यान झाला या दरम्यान 246 गाड्या माल भरला गेला, त्याची एकूण रकम बाजार भाव प्रमाणे सुमारे सुमारे 4 कोटी पन्नास लाख रुपये इतकी होते, यापैकी सुमारे 1 कोटी 50 लाख रक्कम त्यांनी दिली असल्याचे यावेळी सानिया यांनी सांगितले.

शेतकर्‍यांचे जबाब घेत आहोत
याबाबत सावदा पो.स्टे.चे स.पो.नि राहुल वाघ यांनी सांगितले कि सानिया कादरी यांनी अर्ज दिला असून कागदपत्रे प्रती देखील आहेत त्यांना आम्ही मूळ प्रती मागितल्या आहेत, तसेच आम्ही सदर हिशोब तपासत असून शेतकर्‍यांचे जबाब घेत आहोत, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नेवे यांचे मार्गदर्शना खाली पी.एस.आय मनोज खडसे चौकशी करीत असून ती पूर्ण झाल्या नंतरच निर्णय घेऊ असे सांगितले

अटकेची केली मागणी
अनेकदा मोबाईलवर संपर्क करून देखील त्यांनी काही ना काही कारण करून वेळ मारून नेली टते अद्यापपर्यंत शेतकर्‍यांचे पैसे देत नसून मी मध्यस्ती असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून सावदा पो.स्टे.ला अर्ज देऊन सोबत सर्व व्यवहाराचे कागदपत्रे यांची प्रती दिल्या असून त्यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी साठी मी उपोषणास बसले असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले, याच वेळी त्यांनी या भागात अनेक व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होत असते व्यापारी माल घेऊन अनेक वेळा पैसे देत नाही कमी भावाने पैसे देतात अश्या रीतीने कोण्या शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्यास त्यांचेसाठी सुद्धा मी लढा देईल असे उपोषणास बसलेल्या सानिया कादरी यांनी बोलतांना सांगितले.