भुसावळ- भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष तथा संतोषी माता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे यांच्यासह संचालक मंडळ, वसुली अधिकारी व तत्कालीन सहाय्यक निबंधकांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात बनावट शिक्का करून फसवणूक केल्याप्रकरणी रवींद्र भोळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होता. गुन्ह्यानंतर चेअरमन वासुदेव इंगळे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती तर खंडपीठात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला मात्र तेथेही त्यांना दिलासा न मिळाल्याने त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला. तक्रारदार रवींद्र भोळे यांच्यावतीने अॅड.अजय मल्हार व अॅड.विजय सूर्शवंशी तर इंगळे यांच्या वतीने अॅड.कातनेश्वर यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, वासुदेव इंगळे हे आता भुसावळ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगण्यात आले.