फसवणूक भोवली : भुसावळातील सनदी लेखा परीक्षक पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी तथा चार्टड अकाऊटंट तथा सनदी लेखा परीक्षक राजेश आर.कलंत्री यांना पोलिसांनी गुरूवारी अटक केल्याने भुसावळातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. कलंत्री हे विठ्ठल रूखमाई पतसंस्थेचे 2014-15 मध्ये सनदी लेखा परीक्षक असतांना त्यांनी त्यांच्याकडे सहाय्यक निबंधकांनी अधिकार नसतांना सुध्दा त्यांनी अप्रामाणिकपणे व कपट करून आपणास अधिकार असल्याचे भासवून वसुली अधिकारी असल्याचे आहोत, असे खोटे सांगून प्रदीप नेहते यांच्या मिळकतीवर स्थावर जप्ती आदेश अनधिकृतपणे तयार करून व त्यांना जप्ती करण्याचे व मिळकत विक्री करण्याचे अधिकार आहेत, असे खोटे भासवून बोगस व बनावट आदेशावर विशेष विक्री व अधिकारी म्हणून सही व शिक्का केला व त्याद्वारे त्यांच्या मिळकतीवर बोजा बसवून त्याने कर्जदार व जामिनदारांचा विश्वास संपादन करून त्यांची व शासनाची फसवणूक केली म्हणून सहायक निबंधक (चोपडा) मधुसुदन हरीनिवास लाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 सप्टेबर 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात होता. तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अंबादास पाथरवट करीत आहेत.