दोन परदेशी मुलींसह तिघींची सुटका
पुणे । शहरातील फाइव्हस्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेशाव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. या मुलींमध्ये १ रशियन, १ उझबेकीस्तान आणि एका दिल्लीच्या मुलीच्या समावेश आहे. पोलिसांनी यावेळी वेशाव्यवसाय चालवणार्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
परदेशी मुलींना जादा पैसे देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेशाव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करत पुण्यातील एका फाइव्हस्टार हॉटेलवर छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी राहुल उर्फ राजू, जॉन उर्फ प्रकाश शर्मा उर्फ जतीन चावला, सागर, टोनी आणि सुरेश या पाच जणांवर गुन्हा दाखल केला.