युनियन होऊ शकत नाही या गैरसमजाला छेद देत आयटी एम्प्लॉईजची युनियन स्थापन
पिंपरी-चिंचवड : फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज फाईटतर्फे शनिवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजता पिंपळे सौदागर येथे आयटी कर्मचार्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयटी कर्मचार्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी पवनजीत माने, जनरल सेक्रेटरी इ. राजा, जॉईंट सेक्रेटरी हरप्रीत सालुजा, उपाध्यक्ष पद्मजा पवार, युनियनचे खजिनदार सुरेश होसके, विक्रम भोर, हर्षल बनछोड आणि विक्रम भोर आदी उपस्थित होते.
फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज
फोरम फॉर आयटी एम्लॉईज (फाईट) ही आयटी एम्प्लॉईज युनियन आहे. ही संस्था अधिकृतरित्या डिसेंबरमध्ये स्थापन करण्यात आली. मात्र, याचे काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू आहे. आयटीमध्ये कर्मचार्यांची युनियन होऊ शकत नाही या गैरसमजाला छेद देत आयटी एम्प्लॉईजची युनियन स्थापन करण्यात आली आहे. यामार्फत आयटी कर्मचा-यांना नोटीस न देता कामावरून कमी करणे, कर्मचा-यांना त्यांच्या परफॉमन्सबद्दल नोटीस न देता त्यांना प्रॉफीट होत नाही म्हणून कामावरून कमी केले जाते. ज्यामध्ये कर्मचा-यांचे मोठे नुकसान होते. याचा निषेध करत युनियनने याबाबत आयटी कर्मचा-यांमध्ये जनजागृती केली.
संघटनेतर्फे 30 खटले
युनियनमार्फत अशा कर्मचा-यांसाठी अतिशय कमी किमतीत वकीलांमार्फत लेबर कमिशनर ऑफिसकडे पुण्यातील 100 कर्मचा-यांच्या केसेस रजिस्टर केल्या आहेत. तसेच 30 केस लेबर कोर्टात सुरू आहेत. या सर्वांबाबत कर्मचा-यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांच्या मॅटर्निटी रजा, त्यांच्या होणा-या लैंगिक शोषणाबाबत देखील युनिअन मार्फत मदत करण्यात येते. जास्तीत जास्त आयटी कर्मचा-यांना याबाबत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.