फागण्यात पेट्रोलपंपावर दरोडा; पंधरा हजाराची लूट; एकाचा खून

0

धुळे। पहाटे 3.00 वाजेच्या दरम्यान धुळे ते जळगाव हायवे रोडवर फागणे गावापासून 3 कि.मी.अंतरावर एच.पी.कंपनीचे कोयल पेट्रोल पंपावर 30 ते 32 वयोगटातील 3 अज्ञात इसम तोंडाला फडके बांधुन आले. पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या 3 कामगार यांना काठीने मारहाण करुन अंदाजे 10 ते 11 हजार नगदी हातातील चांदीचे ब्रासलेट ,मोबाईल लुटून नेले असुन पेट्रोल पंपावर झोपलेला रोलर ड्रायव्हर याला झोपेत मारहाण केली असुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागेवरच मरण पावला आहे.अज्ञात चोरटे हिंदी भाषा बोलत होते. अंगात बनियन पॅन्ट घातलेले होते.

तीन अज्ञात इसम
नागपुर महामार्गावरील फागणे गाववजवळील कोयल फिलिंग स्टेशन पेट्रोल पंपावर पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास अज्ञातांनी दरोडा टाकला. तीन अज्ञात इसम सुरत- नागपूर महामार्गावर पायी चालत आले. त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपासमोरील ध्वज फाडून तोंडाला बांधून पंपाच्या केबिनमध्ये शिरकाव केला. काठी आणि धारदार शस्त्राने पंपावरील एका कर्मचार्‍यावर त्यांनी काठीने वार केला. त्याला गंभीर जखमी केले.

दोन जणांना घेतले ताब्यात
गल्ल्यातील रोख 15 हजार लुटून सीसीटीव्ही कॅमेरे तोडून अन्य दोन कर्मचार्‍यांना मारहाण करून दहशत निर्माण करत तेथून त्यांनी पोबारा केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात केबिनमधील एका कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेला कर्मचारी निफाड येथील रहिवासी आहे.तर पंपावरील अन्य तीन कर्मचारी जखमी असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस फौजफाटा तैनात झाला असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक हिंमत जाधव, निलेश सोनवणे, एलसीबीचे निरीक्षक रमेश परदेशी, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही तासात पोलीसांनी तपास कामी पथके रवाना करून फागणे पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.