जळगाव। शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) मध्ये बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका विद्यार्थ्याला तिघांनी फायटरने मारहाण डोके फोडल्याची घटना घडली. दरम्यान, विद्याथ्याने त्यांच्याकडे पाहिल्याच्या किरकोळ कारणावरून ही मारहाण झाली असून विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे पाहताच त्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, याप्रकरणी विद्यार्थ्याने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मारहाण करणारे तरूण दारूच्या नशेत
सावखेडा शिवारातील शांतीनगर नगर येथील रहिवासी रोहित गुलाबराव सुर्यवंशी (वय-16) हा शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात फिटर ट्रेडचे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तो सकाळी नेहमी सकाळी आयटीआयमध्ये आल्यानंतर दुपारी 1 वाजता रोहित हा मित्रासोबत वर्कशॉपमध्ये बसला. त्याचवेळी चेतन वारके(रा.पार्वतीनगर), कृष्णा शेकोकर (रा.हरिविठ्ठल) हे विद्यार्थी त्यांच्या एका मित्रासोबत दारूच्या नशेत त्या ठिकाणाहून जात असतांना रोहित व त्याचा मित्र यांनी त्यांच्याकडे पाहिले. पाहिल्याचा राग येवून चेतन आणि कृष्णा यांनी तू काय पाहतो असे जाब विचारून रोहितला शिवीगाळ केली. यानंतर दोघांनी काही कारण नसतांना रोहितला मारहाण करून डोक्यात फायटरने वार करून डोके फोडले. रोहित याच्या डोक्याला गंभीर इजा होवून रक्तस्त्राव सुरू झाल्याचे पाहून चेतन, कृष्णा व त्याच्या मित्राने त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर विद्यार्थ्यांची गर्दी जमल्यानंतर रोहितला त्याच्या मित्रांनी लागलीच खाजगी रूग्णालयात नेवून प्राथमिक उपचार केले आणि तातडीने जिल्हा पेठ पोलिस स्टेशन ठाण्यात येवून तिघांविरूध्द तक्रार दाखल केली.