मॅन ऑफ द मॅच हा किताब श्रावणी देसाई
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील मुलींना क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून, लेक वाचवा लेक शिकवा या संकल्पनेतून प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लबने प्रथमच गुलाबी चेंडूवर मावळमध्ये प्रथमच महिला टी 20 हा सामना खेळवण्यात आला. या सामन्याचे उद्घाटन नगरसेविका पूजा वहिले व शोभा वहिले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम फलंदाजी करीत व्हेरॉक अॅकॅडमीने 4 बाद 76 धावा केल्या तसेच पीडीसीए संघाने 4 बाद 77 धावा करत विजय मिळविला. या सामन्यातील श्रावणी देसाई यांनी 28 व चार्मीने 12 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच हा किताब श्रावणी देसाईला देण्यात आला. या स्पर्धेसाठी श्री ऐश्वर्यलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था, श्री साई हायड्रोलिक्स करडंक यांनी विशेष सहकार्य केले.
हे देखील वाचा
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
या स्पर्धेचा बक्षीस संमारभ पद्मावती ढोरे, भारती गिरमे, रुपाली खैरे, सीमा भिलारे, सुवर्णा वहिले, वर्षा वहिले, अमृता धाडवे, देविका गिरमे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी किरण धाडवे, शैलेश वहिले, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर वहिले, माजी उपसरपंच विशाल वहिले, प्रतीक गिरमे, स्वप्नील ढमाले, विराज वहिले, अथर्व वहिले, उदयराज वहिले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विजेते व उपविजेता संघाचे आभार महिला काँग्रेस अध्यक्षा वनिता देसकर यांनी मानले. सूत्रसंचालन संतोष खैरे रोहित गिरमे यांनी केले. संक्षिप्त धावफलक : व्हेराँक संघ 13 षटकात चार बाद 76 (मणाली -19, श्रध्दा -12, मानसी -11, प्रिया भोखरे -1/23, सायली लोणकर -1/15) विजयी वि पराभूत पीडीसीए संघ 11.1 षटकात चार बाद 77( श्रावणी देसाई -28*, चार्मी -12,तेजश्री -11, श्रध्दा -1/14, मुळे -2/10).