यावल- फायनान्स असलेला ट्रक विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आनंद सुकदेव मेघे (रा.डोंगरकठोरा) यांनी यावल न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानुसार त्यांनी 12 जुलै 2018 रोजी संशयीत आरोपी अशोक श्रीराम राठोड (रा.पालेखुर्द, पो.देवीपाडा, पनवेल) यांच्याकडून सहा लाख पाच हजार रूपयात ट्रक (क्रमांक जी.जे.17 ए.जी.6227) चा सौदा केला. पंडीत कडू उंबरकर (रा.यावल) यांच्या समक्ष व अॅड.के.डी.पाटील यांच्याकडून नोटरी करत एक लाख 40 हजार रुपये संशयीत आरोपी दिले तर उर्वरीत रक्कम फायनान्सद्वारे द्यायची होती मात्र संबंधीत दोघांनी ट्रकचा खरेदी व्यवहार होण्यापूर्वीच बेलापूर येथील फायनान्स कंपनीचे दोन हप्ते थकवल्याची बाब त्यांनी फिर्यादीपासून लपवली. यानंतर फायनान्स कंपनीने मेघे यांनी घेतलेला ट्रक ओढून नेला. नंतर त्याची विक्री केली. या प्रकरणी राठोडसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहेत.