फारुक शेख व माकडे यांना क्रीडा पुरस्कार

0

जळगाव। क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे जिल्हा क्रीडा पुरस्कार 2016 चे जाहीर करण्यात आलेले आहेत. यात गुणवंत क्रीडा संघटक जिल्हा क्रीडा पुरस्कार हा जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे समन्वयक शेख फारुक अब्दुल्ला यांना जाहीर झालेला आहे. तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शकाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार जळगावच्या सिद्धी विनायक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनिल हरिचंद्र माकडे यांना जाहीर झाला आहे.

फारुक शेख यांनी विविध खेळाच्या बर्‍याच संघटना स्थापन करण्यात मोलाचे योगदान दिलेले असून त्या संघटनांवर ते पदाधिकारी आहेत.