यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या मेळाव्यात 100 हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. संजीव देशपांडे व प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य डॉ. देशपांडे आणि डॉ. व्यवहारे यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी नागेश देबगुंडे आणि प्रियांका सोनार यांनी जुन्या आठवणीनां उजाळा देत आपला अनुभव व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा धुळासावंत यांनी केले. सुत्रसंचालन क्षितीज मांढरे व ओंकार मचाले यांनी केले. प्रा. भावना कापसे यांनी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीच्या कार्याचा आढावा घेतला. तर आभार प्रदर्शन प्रा. निलिमा मोढवे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस. के. जोशी (निवृत्त) व चेअरमन सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.