फार्मसी महाविद्यालयातर्फे जागतिक फार्मसीस्ट दिन उत्साहात

0

पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेस वंदन करून काढली रॅली
अमळनेर – येथील खा.शि. मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे २५ सप्टेंबर २०१८ या जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त शहरात जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेस वंदन करून रॅलीस सुरुवात झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांतून फिरत, यात बेटी पढाओ देश बचावो, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती व स्वच्छतेचे महत्व पटवणारी पथनाट्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आली. फलक व उद्घोषणांद्वारे फार्मासिस्ट ची हेल्थ केअर प्रणालीत असलेली भूमिका व महत्व सांगण्यात आले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल, कार्यौपाध्यक्ष जितेंद्र जैन, खा.शि. मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन योगेश मुंदडे, मंडळाचे सदस्य डॉ. बी.एस.पाटील, हरी वाणी, डॉ. संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल, अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष मिलिंद डेरे, सचिव प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष सचिन चोपडा, सदस्य प्रवीण माळी, राकेश चौधरी, विजय ढवळे, नरेंद्र पाटील व इतर औषधी विक्रेते उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी कॉलेजचे प्राचार्य प्रा. रविंद्र माळी, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.
-फोटो आहे