फार्मसी महाविद्यालयातील कॅम्पस मुलाखतीत 26 विद्यार्थ्यांची निवड

0

शिरपूर । येेथील आर.सी पटेल फार्मसी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सन फार्मासुटिकल्स प्रायव्हेट लि. (मुंबई) या मल्टिनॅशनल कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हयू मध्ये बी.फार्मसी आणि एम.फार्मसीच्या 20 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कंपनीच्या जनरल मॅनेजर अखिलेश खाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कॅम्पस इंटरव्हयूसाठी 125 विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत (फर्स्ट राउंड मध्ये) ऑनलाईन टेस्ट साठी सहभाग नोंदविला होता. त्यातून मुलाखतीसाठी 32 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात सर्व 26 विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निवड झाली. यात बी.फार्मसीचे निवेदिता चव्हाण, विशाल हिरे, जय सेठीया, ज्ञानेश्वर पांचाळ, विवेक पाटील, हितेश लोहार, रोनक अग्रवाल, नितीन भावसार, गौरव पाटील यांचा समावेश आहे.

खाळे यांनी घेतल्या मुलाखती
आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आधुनिक शिक्षण पद्धती, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक एकूणच या सर्व बाबींचे आकलन करून सन फार्मा कंपनीने या महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात आले होते. जनरल मॅनेजर अखिलेश खाळे यांनी मुलाखती संपल्यावर प्राचार्य डॉ. एस.जे.सुराणा यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील शिस्त, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा, अकॅडेमिक ऍक्टिव्हिटीज या सर्वांबद्दल समाधान व्यक्त केले.

यांनी पाहिले कामकाज
मुलाखतीसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. अनिल टाटिया, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट आफिसर श्रीमती पुजा जसवाणी, रजिस्ट्रार तथा जनसंपर्क अधिकारी जितेश जाधव, प्रा.उमेश लड्ढा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या विद्यार्थ्यांची निवड
बी.फार्मसीचे योगेश्वर ततार, दिपक सुर्यवंशी, चंदन सिंधी, नूतन भोई, प्रशांत जैन, अंकीता पाटील, वषाली काळे, कांचन पाटील, सोनल माहेश्वरी, प्रेमकुमार बाविस्कर, प्रतिक्षा सुर्यवंशी, निकीता जेठानंदददलानी, वैशाली चौधरी, मोनिका गिरासे, अक्षय संकलेचा, मोनिका जाधव हे बी.फार्मसीचे 25 विद्यार्थी व एम.फार्मसीचा संकेतकुमार गांधी यांची निवड झाली आहे. तसेच रुपेश वाडीले, दिपाली बागल, सतिष कायंडे, मोहम्मद मुदस्स्र, मयूर चौधरी, भाग्यश्री पाटील, हर्षल पाटील यांची निवड झली आहे.