फिंचच्या जागी हँड्सकॉम्बला संधी

0

चेन्नई । भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंचला दुखापत झाल्याने तो सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी संघात पीटर हँड्सकॉम्बला संधी देण्यात आली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी होत असलेल्या सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर हँड्सकॉम्ब चेन्नईसाठी रवाना होणार आहे. गुरुवारी सराव सुरू असताना फिंचच्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे तो एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही. दरम्यान, भारताच्या संघातही एक बदल झालाय.

भारताचा सलामीवीर शिखर धवन आपल्या आजारी बायकोला भेटण्यासाठी गेल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. भारताविरुद्ध होणार्‍या क्रिकेट सामन्यासांठी ऑस्ट्रेलियाने कंबर कसली आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यापेक्षा मोठी मालिका असू शकत नसल्याचे मार्गदर्शक डेविड सेकर यांनी सांगितले. भारताविरूद्ध होणार्‍या आगामी मालिकेत वेगवान गोलंदाज पेट कमिन्स पाच एकदिवसीय सामन्यात खेळावा अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असल्याचे काळजीवाहू मार्गदर्शक डेविड सेकर यांनी सांगितले. आता आम्ही त्याला सर्वसामन्यांमध्ये खेळवण्यासाठी एक धोरण तयार करत आहोत. त्याच्या शेड्युल्डची जाणीव आहे, परंतु ही महत्त्वाची मालिका असल्याचे ते म्हणाले. मुख्य कोच डॅरेन लेहमनच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज प्रशिक्षक ही भूमिका बजावत आहे. प्लॅन एनुसार कमिन्सला भारताविरुद्धच्या सर्व सामन्यांमध्ये खेळवले जाईल आणि त्याला विश्रांती देणे हा प्लॅन बी असेल. मिशेल स्टार्क, जोश हाझलवुड व जेम्स पॅटिन्सन यांच्या दुखापतीमुळे कमिन्स वर सर्वांचे लक्ष लागले आहे.