लंडन । ऑस्ट्रेलियाने पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेचा 2 विकेट्सने पराभव केला. लंकेने दिलेल्या 319 धावांचे भलेमोठे आव्हान 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 2 चेंडू राखून पार केले. सलामीवीर अॅरोन फिंचचे शानदार शतक व ट्राविस हेडने केलेल नाबाद अर्धशतकच्या बळावर ही लीलया पार केली.
श्रीलंकेने निर्धारीत 50 षटकात 7 बाद 318 धावांची मजबूत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव मध्यंतराला अडखळला. परंतु, सलामीवीर फिंचने 109 चेंडूत 11 चौकार व 6 षटकारांचा पाऊस पाडत तडाखेबंद 137 धावांची खेळी केली. हेडने फिंचला योग्य साथ देताना 73 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 85 धावा करत विजय मिळवून दिला.