‘फिजिकल डिस्टन्सिंग’पाळत प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात वर्धापन दिन साजरा

0

मुंबई – कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संंरक्षणमंत्री छगन भुजबळ, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे – पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सर्व नेत्यांनी मास्क परिधान करुन ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन केले.

राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसैमिया व अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी रक्ताची कमतरता जाणवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.