फिट आल्याने विद्यार्थ्याचा शाळेतच झाला मृत्यू

0

एरंडोल । शाळेत गेलेल्या दहा वर्षीय विद्यार्थ्याचा वर्गातच फिट आल्याने मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धारागीर ता.एरंडोल येथे घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले कि धारागीर ता.एरंडोल येथील गौरव समाधान पाटील (10) हा गावातीलच जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता. आज नेहमी प्रमाणे गौरव शाळेत गेला असता दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यास वर्गातच अचानक फिट आल्यामुळे तो खाली पडला शाळेतील शिक्षकांनी त्याच्या घरी निरोप दिल्यानंतर त्यास शिक्षकांच्याच वाहनात ग्रामीण रुग्नालयात आणले असता डॉ.रांनी त्यास मयत घोषित केले. याबाबत धनसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोउनि एम.एस.बैसाणे तपास करीत आहे.