जळगाव । एमआयडीसी परिसरातील एम सेक्टरमधील 132 केव्ही सबस्टेशनच्या एका फिडरचा जंप तुटयाने स्पार्किंग होवून परिसरातील गवत जळून खाक झाले. त्यामुहे परिसरातील 33 केव्हीचे 13 फिडर बंद करण्यात आले होते. ही घटना दुपारी 4.40 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सबस्टेशनमधील अधिकारी यांनी दिलेली माहिती अशी की, सबस्टेशनमधील सुप्रिम कंपनीचा 33 केव्ही फिडरचा सीटी साईडचा आऊटगोईंग वाय फेज जम्प अचानक तुटल्याने स्पार्किंग झाली. त्यामुळे सबस्टेशनच्या आवारातील गवताने अचानक पेट घेतला. गवत वाळलेले असल्याने काही वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. सबस्टेशनमधील सिनीयर ऑपरेटर तथा शिफ्ट इंचार्ज रत्ना शिंदे यांनी तात्काळ याबाबत अग्निशमन विभागाला माहिती कळविली. तीन अग्निशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने जवळपास दिड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीमुळे सबस्टेशनमधील 33 केव्हीचे 13 फिडर बंद करण्यात आले. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील अर्ध्या परिसराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.