जळगाव। येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजीत फिनीक्स स्पर्धेचा पारीतोषिक वितरण समारंभ थाटात पार पडला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात येत असलेल्या ‘फिनिक्स’ या स्पर्धेच्या पारीतोषिक वितरण समारंभाला प्राचार्य डॉ. व्ही.जी. अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक, प्रा. व्हि.एच. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयता आयोजन राज्यातील तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 800 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला. रोबो वॉर स्पर्धेत भुसावळ येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयातील विरेंद्रसिंग खंडाळे हा प्रथम विजेता ठरला. लेथ वॉरमध्ये गोदावरी अभियांत्रिकीचे निलेश देवरे व वैभव पाटील हे प्रथम तर रायसोनीचे भुषण सुरवाडे, विवेक सोनार हे द्वितीय ठरले. जंको फनमध्ये शेगाव अभियांत्रिकीची भाग्यश्री पोले ही प्रथम तर राजश्री, हर्षदा, ममता राठोड द्वितीय ठरल्या. गेम वारमध्ये देवकर अभियांत्रिकीच्या प्रसाद अमृतकर हा प्रथम आला. कॅड वारमध्ये गोदावरी अभियांत्रिकीचा कार्तिक पालीवाल, अॅडमॅड शोमध्ये प्रसाद देशमुख व निकेत बकाल ह प्रथम तर प्रियंका शिरसाठ, शितल पाटील, रश्मी पाटील या द्वितीय ठरल्या. बॉक्स क्रिकेट (मुले)मध्ये जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतन तर मुलींमध्ये भुसावळच्या गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या संघाने बाजी मारली. समन्वयक म्हणुन प्रा. तुषार कोळी प्रा. निलेश चौधरी, आदींनी कामकाज पाहिले.