मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते अनावरण
नेरुळ । दिनांक ६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत भारतात संपन्न होणार्या १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल फिफा २०१७ स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई हे एक यजमान शहर असून आज ‘होस्ट सिटी’ लोगोचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात अनावरण करण्यात आले. त्या स्पर्धेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सध्या सुरु आहे.
याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उप महापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., शिवसेना युवासेना प्रमुख तथा मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, स्पर्धेचे संचालक जेविअर सेवी आदी मान्यवर उपस्थित होते.