फिफा क्रमवारीत भारताची 96 व्या स्थानावर झेप

0

नवी दिल्ली । फुटबॉल खेळाच्या जागतिक पालक संघटनेच्या, फिफा क्रमवारीत 100 व्या स्थानावर असलेल्या भारताने नविन क्रमावरीत मोठी झेप घेतली आहे. मागील 21 वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना भारताने या क्रमवारीत 96 वे स्थान मिळवले आहे. या आधी भारताने फेब्रुवारी 1996 मध्ये 94 वा क्रमांक मिळवला होता. 1 जुन रोजी फिफाने जाहिर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघ 100 व्या क्रमांकावर होता. ही क्रमवारी जाहिर झाल्यावर भारताने दोन सामने जिंंकले होते. त्याचा फायदा भारतीय संघाला नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीत मिळाला. मार्च 2015 मध्ये भारतीय संघ 173 व्या क्रमांकावर होता. मधल्या काळात भारताने तब्बल 77 गुण मिळवून आघाडीच्या शंभर संघामध्ये स्थान मिळवले. फिफाने जागतिक क्रमवारी जाहिर करण्यास सुरुवात केल्यापासून भारतीय संघ 134 व्या क्रमांकावर घुटमळत होता. इराणचा संघ 23 व्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघाचा मार्गदर्शक झाल्यावर संघाला पहिल्या 100 संघामध्ये स्थान मिळवून देण्याचे लक्श्य समोर ठेवले होते. खेळाडू, माझे इतर सहकारी आणि भारतीय फुटबॉल हासंघाचे त्यात मोठे योगदान आहे. संघासमोर आणखी मोठी आव्हाने आहेत त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आगामी आशिायई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्थान मिळवणे हेआमचे उद्दीष्ट आहे.

– स्टीफन कॉन्स्टटाईन
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक