फिरोदिया पुरस्कार प्रा. त्रिवेदी, प्रा. मेयर, निलेकणी यांना जाहीर

0

पुणे : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा एच. के. फिरोदिया पुरस्कार यंदा मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे (टीआयएफआर) संचालक प्रा. संदीप त्रिवेदी आणि बेंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचे (एनसीबीएस) संचालक प्रा. सत्यजित मेयर यांना जाहीर झाला आहे. तसेच, इन्फोसिसचे सहअध्यक्ष नंदन निलेकणी यांना एच. के. फिरोदिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. फिरोदिया पुरस्कारांचे यंदाचे तेविसावे वर्ष असून, येत्या 1 फेब्रुवारीला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरआणि ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.  या प्रसंगी जयश्री फिरोदिया, प्रा. के. सी. मोहिते, दीपक शिकारपूर उपस्थित होते.

यंदाच्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी प्रा. संदीप त्रिवेदी यांची निवड करण्यात आली आहे. विज्ञान भूषण पुरस्कारासाठी जीवशास्त्रज्ञ प्रा. सत्यजित मेयर यांची निवड करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहअध्यक्ष नंदन निलेकणी यांना मिळाला आहे.विज्ञानावर आधारीत ऑनलाइन प्रश्‍नमंजुषा स्पर्धा आयोजित केली असून पाऊण तासाच्या ऑनलाइन प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणार्‍या विद्यार्थ्यांना पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. तसेच सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. स्पर्धेत सहभागासाठी www.quiz. hkfi rodiaawards.org ही वेबसाइट पाहावी.