पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा सामना करणार्या देशातील आरोग्य कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय, नरेंद्र मोदींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडियोला त्यांनी ‘फिर मुस्कुराएगा इंडिया… फिर जीत जाएगा इंडिया’ अशी टॅग लाईन दिली आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांसह क्रिकेटपटू शिखर धवन दिसत आहेत. या व्हिडीओच्या गाण्यामधून लोकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी एकजूट होण्याचे आणि घरातच राहण्यासाठी आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लिहिले आहे की, आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण फक्त आपल्या एकमेकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करुया नको, तर कोरोनाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करण्यार्या त्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचार्यांचेही आभार व्यक्त करूया. याचबरोबर, नरेंद्र मोदी म्हणाले, जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण खात्रीपूर्वक सोशल डिस्टंसिंगचे पालन करूया. ज्यामुळे आपल्यासह दुसर्याच्या जीवाची सुरक्षा करता येईल. आशा आहे की हे दिवस आपल्याला वर्षभरासाठी व्यक्तीगत फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करतील, जे आपल्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.