मनीला। फिलिपाइन्सची राजधानी असलेल्या मनीला शहराच्या कॅसिनोमध्ये एकट्या शस्त्रधार्याने केलेल्या हल्ल्यात 34 जण ठार झाले आहेत. चढवला आहे. या घटनेनंतर कॅसिनोमधून सुमारे 34 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना शुक्रवारी पहाटे राजधानीतील रिसॉर्ट वर्ल्ड मलीना कॅसिनोमध्ये घडली आहे. शस्त्रधारी व्यक्तीने हल्ला चढवला असला तरी मृतांमध्ये कुणाच्याही शरीरावर गोळी लागल्याचे दिसत नाही. मृतांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी केला. मृतांची ओळख पटविण्याचे आणि मृत्यूचे कारण शोधण्याचे काम सुरू असून, घटनेची चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
जुगाराचा खेळ सुरू असताना शस्त्रधारी व्यक्तीने जुगार मशीनवर गोळ्या घातल्या आणि टेबलांना आगी लावल्या. त्यानंतर त्याने खोलीमधील किमती वस्तू आणि गेमिंगची चीप चोरली, असे फिलिपाईन्सचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख रोनॉल्ड डेला रोसा यांनी सांगितले. जवळपास 113 मिलीयन पिसोस (स्थानिक चलन) किमतीचे चीप हल्लेखोराने बॅगमध्ये भरले होते. मात्र ती बॅग पोलिसांच्या हाती लागेली. दरम्यान, हल्लेखोराने टेबलांना आगी लाऊन स्वत:लाही पेटवून घेत आत्महत्या केली, असे पोलिसांच्या हवाल्याने एका मध्यामाने म्हटले आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हल्लेखोराने आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितल्याचे माध्यमाने म्हटले आहे.
अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर रिसॉर्ट्स वर्ल्ड मनिला बंद ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे. सुरक्षेचा विचार करून फिलिपिन्स पोलिसांना सहकार्य करत आहे. कॅसिनोतील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, असेदेखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असल्याची माहिती दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एसआयटीईने दिली.