66 lakh loan of members of finance company in Muktainagar: crime against trio मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील भारत फायनान्स इक्लयुजन लि. शाखेतील फिल्ड फिल्ड असिस्टंट अन्य दोघा सदस्यांनी कंपनीतील 247 सदस्यांचे अंगठे बायोमॅट्रीक पद्धत्तीने घेतल्याचे भासवून कर्ज वाटप केल्याचे दर्शवत तब्बल 66 लाख 66 हजार रुपयांची कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीचे शाखा व्यवस्थापक एकनाथ भीमगीर गोसावी यांनी गुरुवारी मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
मुक्ताईनगर शहरात भारत फायनान्स कंपनीचे कार्यालय असून त्याद्वारे कर्ज वाटप केले होते. या कंपनीतील फिल्ड असिस्टंट निखील राजेंद्र सावकार (54, राज शाळेजवळ, एमडीएस कॉलनी, जळगाव), अवधुत ज्ञानेश्वर सोनवणे (रेलगाव फुलंब्री, जि.औरंगाबाद) व पंकज रामधन वानखेडे (शेळगाव मुकुंद, ता.चिखली, जि.बुलढाणा) यांनी संगनमत करीत कंपनीच्या 247 सदस्याचे बायोमॅट्रीक पद्ध्दतीने कर्ज मंजूर केल्याचे दाखवत 66 लाख 66 हजार 924 रुपये लाटून कंपनीची फसवणूक केली. 1 सप्टेंबर 2021 ते 15 मे 2022 या कालावधीत हा अपहार घडला. या संदर्भात फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक एकनाथ भीमगीर गोसावी (32, रा.चाळीसगाव) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरील तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.