Major action of Shahada Police in Toranmal Ghat: Illegal liquor stock worth Rs. 25 lakh seized शहादा : शहादा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पळून जाणार्या दारूच्या खोक्यांनी भरलेली पिकअप वाहन तोरणमाळ घाटात जप्त केली असून वाहनासह २४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आल्याने अवैधरीत्या दारूची वाहतूक करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना पाहता वाहन चालकास तीन संशयीत पसार झाले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार आपल्या पोलीस कर्मचार्यांसह विभागीय गस्तीवर बामरलर त्यांना भ्रमणध्वनीवर शहादा-खेतिया रस्त्यावर दरा फाट्याजवळ दारूच्या खोक्यांनी भरलेली पिकअप व्हॅन येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचल्यानंतर संशयीत वाहन येताच त्यास थांबवण्याच्या इशारा केला मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता म्हसावद रस्त्याकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला मात्र वाहन चालक सुसाट वेगाने निघाल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी तत्काळ म्हसावद पोलिसांशी संपर्क साधला. हवालदार बहादुर भिलाल, कॉन्स्टेबल सचिन वसावे यांनी नांदे तालुका शहादा गावाजवळ पोलीस वाहन रस्त्यावर आडवी लावले मात्र पिकअप वाहन चालकाने पोलीस गाडीला ठोस मारून तोरणमाळ रस्त्याकडे पळ काढला. म्हसावद पोलीस व शहादा पोलीस अशा दोन पोलीस ठाण्याच्या वाहनांनी संशयीत वाहनाचा पाठलाग केला. तोरणमाळ घाटात दारूच्या खोक्याने भरलेले वाहन चढू शकले नसल्याने थांबले. संधीचा फायदा घेऊन वाहन चालक सह तीन आरोपी पसार झाले.
२४ लाखांचा मद्यसाठा जप्त
पोलिसांनी दारूच्या खोक्यांनी भरलेले पिकअप वाहन क्रमांक (एम.एच.०८-८९९५) जप्त केले असून त्यातून दारूच्या बाटल्यांनी भरलेले २५० खोक्यातील १९ लाख ८० हजारांची दारू जप्त केली आहे तर पाच लाख रुपये किंमतीची पिकअप व्हॅन जप्त केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाडवी, किरण पवार, दिनकर चव्हाण, मणिलाल पाडवी, मुकेश राठोड, किरण जिरेमल, अनमोल राठोड, म्हसावद पोलीस स्टेशनचे सचिन वसावे, बहादूर भिलाल यांनी केली. पोलिस अनमोल राठोड यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरोधात शहादा पोलिसात जीवे मारण्याच्या प्रयत्न केला म्हणून कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.