फुकट्या प्रवाशांकडून नऊ महिन्यात 135 कोटी 56 लाखांचा दंड वसुल

0

एप्रिल ते डिसेंबर 2018 दरम्यान मध्य रेल्वेच्या विशेष मोहिमेत कारवाई

भुसावळ- मध्य रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर 2018 या काळात राबवलेल्या विशेष मोहिमेत फुकट्या प्रवाशांसह आरक्षित डब्यातून साध्या तिकीटावर प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून तब्बल 135 कोटी 56 लाखांचा दंड वसुल केला. केवळ डिसेंबर महिन्यात 10 कोटी 40 लाखांचे उत्पन्न मिळाले तर डिसेंबर महिन्यात विना तिकीटासह अनियमित या9ा करणार्‍या प्रवाशांसह विना बुकींग सामानाची वाहतूक करणार्‍या प्रवाशांविरुद्ध तब्बल दोन लाख 33 लाख केसेस करण्यात आल्या. गत वर्षाच्या तुलनेत या 13.11 टक्के वाढ झाली आहे तर दंडाच्या रकमेतही 18.72 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात अनियमित यात्रेसह सामानाची विना बुकींग वाहतूक करणार्‍या प्रवाशांविरुद्ध 27.05 लाख केसेस करण्यात आल्या तर गत वर्षी हाच आकडा 24 लाख 40 हजार इतका होता. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना अधिकृत तिकीट काढून नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी केले आहे.