फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रांत

0

म्हसावद रेल्वे स्थानकावर तपासणी मोहिम ; लाखोंचा दंड वसुल

भुसावळ : रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर भुसावळ रेल्वे विभागाने शुक्रवारी अचानक मोहिम आखत म्हसावद रेल्वे स्थानकावर दहा गाड्यांची तपासणी करून कारवाई केल्याने खळबळ उडाली. फुकट्या प्रवाशांसह रेल्वे नियमांचा भंग करणार्‍यांवर कारवाई झाल्याने 402 केसेसच्या माध्यमातून तब्बल एक लाख 63 हजार 235 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. डीआरएम आर.के.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.