जंक्शनमध्ये 300 प्रवाशांकडून दिड लाखांचा दंड वसुल
भुसावळ- फुकट्या प्रवाशांसह आरक्षीत डब्यातून नियमबाह्यरीत्या प्रवास करणार्या प्रवाशांविरूद्ध रेल्वे प्रशासनाकडून विशेष मोहिम राबवली जात असून गुरुवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर दिवसभरात 300 प्रवाशांकडून तब्बल एक लाख 55 हजार 265 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सहायक वाणिज्य प्रबधंक (कोचिंग) श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.
धडक मोहिमेमुळे खळबळ
गुरुवारी सकाळपासून रेल्वे स्थानकावर 27 तिकीट निरीक्षकांसह पाच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना सोबत घेत धडक मोहिमेला प्रारंभ झाला. तिकीट न काढता प्रवास करणार्या 85 प्रवाशांकडून 49 हजार 185 रुपयांचा दंड तसेच रीझर्व्ह डब्यातून आरक्षित तिकीट नसताना प्रवास करणार्या तब्बल 215 प्रवाशांकडून एक लाख सहा हजार 80 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफचे एल.आर.स्वामी, ए.आर.सुरवाडकर, बी.एस.महाजन, के.के.तनती, एस.के.सत्तार, एन.पी.पवार, एन.पी.अहिरराव, हेमंत सावकारे, ए.एस.राजपूत, प्रशांत ठाकूर, अजय खोसला, दीपक शर्मा, एस.जे.श्रीवास्तव, व्हिवेन रॉड्रिक, के.पी.मीना, एस.एन.चौधरी, के.के.मालपानी, जे.के.शर्मा, ए.के.गुप्ता, एस.वि.त्रिवेदी आदी सहभागी झाले.