मुंबई । आजपर्यंत बेशिस्त खेळाडूंवर फुटबॉलसह इतर खेळांमध्ये रेडकार्ड दाखवून त्याला बेशिस्त वर्तन केले म्हणून मैदानाबाहेर पाठविण्यात येत असे. हा नियम आजपर्यंत क्रिकेटमध्ये नव्हता. मात्र आता क्रिकेटमध्येही रेडकार्ड नियम लागू करण्यात येणार असून याचा अधिकार पंचांना देण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून हा नियम लागू होणार आहे.
जगातील मैदानी खेळांमध्ये क्रिकेट सोडल्यास बहुतांशी खेळांमध्ये रेडकार्ड दाखविण्याचा नियम आहे. या नियमानुसार बेशिस्त खेळाडूला मैदानाबाहेर पाठविण्यात येते.
बैठकीत सुधारित नियमांची करण्यात आली शिफारस
हा नियम क्रिकेटमध्ये लागू नव्हता. मात्र क्रिकेटच्या नियमांमध्ये नुकतीच सुधारणा करण्यात आल्या आहे. 1 ऑक्टोबर 2017 पासून सुधारीत नियम लागू करण्यात येतील. अशी माहिती एमसीसी म्हणजे मेरिलेबोन क्रिकेट क्लबने दिले आहे. एमसीसीच्या क्रिकेट समितीची बैठक डिसेंबर महिन्यात पार पडली. याच बैठकीत सुधारित नियमांची शिफारस करण्यात आली होती. क्रिकेटच्या मैदानातल्या बेशिस्त वर्तनाला आळा घालण्याची वेळ आला असल्याची कबुली एमसीसीच्या क्रिकेट समितीचे मुख्य जॉन स्टिफन्सन यांनी दिली. स्थानिक पातळीवर खेळाडूंच्या वाढत्या बेशिस्तिला कंटाळून अनेक पंच खेळापासून दूर जात आहेे. असे स्टिफन्सन यांनी सांगितले. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानातील बेशिस्तीला आळा घालण्यासाठी रेड कार्ड पर्याय स्विकारण्यात आला आहे.