फुटबॉलच्या प्रचार व प्रसारासाठी शासनातर्फे फुटबॉल वितरण मोहीम

0

नवापूर। फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा फुटबॉल खेळाची गोडी निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीड़ा कार्यालय नंदुरबारच्या वतीने प्रत्येक शाळेस 5 फुटबॉल देण्यात येणार असुन सर्व शाळेच्या मुख्याध्यापक /क्रीड़ाशिक्षक यांनी लिंक (hptt://www.surveymonkey.com/r/mission1million) वर आपल्या शाळेचे फॉर्म भरावा तरच फुटबॉल मिळतील असे कळवले आहे. मोबाईल व कंप्यूटरच्या युगात आजचे बालपण हरवत आहे. पुर्ण दिवस मोबाईलवर बोट आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहत माऊसने क्लीक करत डिजिटल युगात असतांना बालपण व युवा वर्ग खेळापासुन दुर झाला आहे. पारंपरिक खेळ तर आजच्या मुलांना माहीत नाही. खो खो, कबड्डी हे शारीरिक खेळ तासनतास मैदानावर खेळ हरवलेला दिसतो. शारीरिक व्यायाम होत नाही आणि अनेक शारीरिक व्याधी आजच्या युवांमध्ये वाढत आहे. खेळाचा हा दुरावा वाढत असतांना आता शासन तो कमी करण्यासाठी पाऊले उचलत आहेत.

फुटबॉल खेळाला मिळेल चालना
फुटबॉल या मैदानी खेळाचा माध्यमातून युवा वर्ग खेळाकडे आकर्षीत होऊन शाळामध्ये मुलांना फुटबॉल खेळायला अधिक चालना या माध्यमातून मिळणार आहे. क्रिकेट हा लोकप्रिय खेळाचे जास्त आकर्षण आहे. फुटबॉल खेळ क्वचित दिसतो.अशा वेळी प्रत्येक शाळेला फुटबॉल देण्याचा शासनाचा जिल्हा क्रीडा विभागाची योजना फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसारासाठी स्वागतार्ह म्हणता येईल. यासाठी क्रिडा शिक्षकांनी सुध्दा प्रोत्साहन देऊन फुटबॉल खेळाला अधिक चालना देत चांगले फुटबॉल खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाची ठरणार आहे.फुटबॉल खेळासाठी शासनाने प्रत्येक शाळेत क्रिडाशिक्षकांना फुटबॉल खेळाचे सखोल ज्ञान देऊन मार्गदर्शन करण्याची गरज तरच तो चांगला खेळाडू तयार करू शकेल. फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेला पाच फूटबॉल देऊन विद्यार्थी खेळाडू ना सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात फलदायी ठरणार आहे.

प्रत्येक शाळेला फुटबॉल देण्याचा निर्णय नक्कीच चांगला आहे फक्त फुटबॉल देऊन उपयोग नाही तर चांगल्या मार्गदर्शनची व कोचची आवश्यकता आहे. तरच फुटबॉल खेळाकडे विद्यार्थामध्ये आवड निर्माण होईल
संग्रामसिंग राजपूत, क्रिडाशिक्षक-श्री शिवाजी हायस्कूल नवापूर

शाळेला फुटबॉल मिळणार असल्याचा आनंद होत असून आमच्या सारख्या खेळाडू ला यातुन अधिक ऊर्जा मिळेल, फुटबॉल खेळाला अधिक मोठ करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात यावी योग्य मार्गदर्शन मिळावे तरच चांगली फुटबॉल टिम तयार होऊन स्पर्धेत चांगली कामगिरी करता येईल
अश्विन पाटील, खेळाडू विद्यार्थी-श्री शिवाजी हायस्कूल नवापूर