मुंबई । फिफाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकवणारा ब्राझीलचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल रोनाल्डीन्हो शुक्रवारी मुंबईत येणार आहे. भारतात प्रिमीअर फुटसालला पुढावा देण्यासाठी आखण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी रोनाल्डीन्हो मुंबईत येणार आहे. या खेळासंबधी घोषणा रोनाल्डिन्हो करण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी प्रिमीअर फुटसालमधील दोन सामने खेळल्यानंतर रोनाल्डिन्होला मायदेशी परतावे लागले होते. रिओ पॅराअॅालिम्पिकसाठी सदिच्छादूत म्हणून उपस्थित राहण्यासाठी रोनाल्डिन्हो मायदेशी परतला होता. प्रिमीअर फुटसालमध्ये गोवा संघातून खेळताना बेंगळुरू फाईव्ह संघाविरुद्ध त्याने पाच गोल केले होते. रोनाल्डिन्हो म्हणाला की, प्रिमीअर फुटबॉल खेळण्याचा अनुभव चांगला होता. भारतात रहाणे आनंददायी असुन, पुन्हा एकदा या देशाकडून मला तशाच स्वागताची आशा आहे.