नवी दिल्ली । नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या फिफा जागतिक फुटबॉल विश्वक्रमवारीत भारताची एका स्थानाने घसरण झाली असून आता भारतीय संघ 97व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जागतिक फुटबॉल महासंघाने जाहीर केलेल्या नव्या सांघिक विश्वक्रमवारीत कॅनडाने पाच स्थानांनी प्रगती केली असून आता त्यांनी 95व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. परिणामी भारताला एक स्थान गमवावे लागले.