फुटबॉल सराव

0

मुंबई । आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना व एएफसी आशिया कप पात्रता फेरीतील आपल्या पहिल्या सामन्याआधी भारतीय राष्ट्रीय संघाने मुंबईतील शहाजी राजे क्रिडासंकुल स्टेडियममध्ये सराव केला. भारतीय खेळाडूंचा सराव अंधेरी येथील स्टेडियममध्ये मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सराव सत्रानंतर कॉन्स्टेनर्टान म्हणाले, की जेव्हा राष्ट्रीय संघासोबत सराव करण्याची संधी मिळते, तो क्षण माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ क्षण असतो. हीच गोष्ट मी सर्वोत्तमरीत्या करू शकतो. माझ्या मते, गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही देशाला गौरवान्वित करण्याची कामगिरी केली आहे.आपल्या पुढील लक्ष्याविषयी कॉन्स्टेनटाईन म्हणाले, की आम्हाला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. मात्र, 2019मध्ये यूएईला होणार्‍या एएफसी आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरणे आमचे सध्या मुख्य लक्ष्य आहे.