ब्युनस आर्यस । अर्जेंटिनामध्ये ‘बेलग्रानो’ आणि ‘टोलरेस’ या दोन संघांदरम्यान झालेल्या फुटबॉल सामन्यावेळी दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात अनेक प्रेक्षक जखमी झाले. या घटनेमध्ये अर्जेंटिनाच्या एका प्रेक्षकाला इतकी मारहाण करण्यात आली की, तो कोमामध्ये गेला आहे. माहितीनुसार कोरडोबामध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान ही घटना घडली तेव्हा बेलग्रानो एमानुएल बलबाओ नावाच्या एका व्यक्तीला इतर प्रेक्षकांनी 57 हजार प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये बदडून काढले. जखमी प्रेक्षकाच्या वडिलांनी ही माहिती दिली.
तरीही खेळवला सामना
व्हिडिओ फुटेजनुसार बलबाओ एका स्टँडवरून खाली आले. या प्रेक्षकाची प्रकृती एकदम गंभीर आहे. तो कोमामध्ये असल्याचे सांगण्यात येते. आणखी एक प्रेक्षक डिएगो फ्राईडमेन हेही या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. क्लबने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही या घटनेमध्ये जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत आराम मिळण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहोत. अर्जेंटिनामध्ये फुटबॉल सामन्यांदरम्यान होणारी ही ताजी घटना आहे. हिंसाचारानंतर हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यामध्ये ‘बेलगानो’ संघ द्वितीय स्थानावर राहिला.