फुटबॉल स्टेडियम चेंगराचेंगरीत 17 ठार

0

अंगोला । उईगे फुटबॉल स्टेडियममध्ये सांता रीटा डेकासिया व लिबेला या संघात सामना होणार होता. हा सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 17 प्रेक्षषक ठार तर शेकडो प्रेक्षषक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. यात 76 जखमींना रूग्णालयात हलविले गेले असून त्यातील पाच जणांचे प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आफ्रिकी देश अंगोलाच्या उत्तर भागातील उईगे शहरातील फुटबॉल स्टेडियममध्ये सांता रीटा डेकासिया टीम व लिबेलो टीम यांच्यात सामना होणार होता. त्यासाठी इतकी प्रचंड गर्दी झाली की लोकांनी गेटवरून आत उड्या मारून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेक प्रेक्षक चेंगरले गेले तर कांही जणांचा जीव घुसमटला. गर्दी इतकी प्रचंड होती की सर्वांना आत प्रवेश दिला असता तर मैदानही अपुरे पडले असते. मात्र प्रवेशद्वाराजवळच्या गर्दीवर काबू मिळविणे शक्य झाले नाही व त्यामुळे गेटवरून प्रेक्षकांनी आत उड्या मारल्या व त्यातून ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत आत प्रवेश मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 17 ठार झाले.