फुटबॉल स्पर्धेची पालकमंत्री, जलसंपदामंत्र्यांकडून जनजागृती

0

जळगाव। फिफा फुटबॉल वर्ल्डकप अंतर्गत महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन फुटबॉल जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 2 जुलै रोजी मा. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी औपचारीक उद्घाटन केले होते. आज राज्यांचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फुटबॉलला किक मारुन या कार्यक्रमाची जनजागृती केली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, चंदू पटेल, हरिभाऊ जावळे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराडे, मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिघेगावकर, प्रांत जलज शर्मा, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे, आरडीसी राहुल मुंडके, नगरसेवक कैलास सोनवणे, अतुल हाडा, फुटबॉल असो. सचिव फारुख शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांची उपस्थिती होती.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या प्रारंभी फारुख शेख यांनी संकल्पना विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक अळवणी. आभार शेखर देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी मोहसीन, अजय खर्चे, जुबेर खान, जुनेद खान, नुतन शेवाळे, हिमाली बोरोले, सरोज व्यास, पूजा सोनवणे, जैन स्पोर्ट्सचे अरविंद देशपांडे, प्रविण ठाकरे, नरेंद्र चव्हाण, रविंद्र धर्माधिकारी, संतोष बडगुजर, प्रा.डॉ.अनिता कोल्हे, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, रेखा पाटील, चांदुरकर यांनी परिश्रम घेतले. रविवार 9 रोजी सकाळी लहान मुले, मुली, महिला मंडळ,विविध खेळातील मान्यवर लहान खेळाडू मुले, मुली, व ज्येष्ठ नागरिकांसाठी फुटबॉल खेळण्यात येईल.