कमलनयन बजाज संघावर 2-0 असा एकतर्फी विजय
पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये नॉव्हेल स्कूल व ज्युनियर कॉलेजचा संघ विजयी ठरला. नॉव्हेल स्कूलच्या संघाने कमलनयन बजाज संघावर 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
उपांत्य सामन्यात अमृता विद्यालयाला नमवले
पिंपरी, संत तुकारामनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. अंतिम सामन्यात नॉव्हेल स्कूलच्या संघाने कमलनयन बजाज संघावर 2-0 असा सहज विजय मिळविला. तत्पूर्वी, झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये नॉव्हेल स्कूलच्या संघाने अमृता विद्यालयाच्या संघाला 1-0 असे नमविले. नॉव्हेल स्कूल संघाकडून अश्वथी हरीकुमार व सिद्धी भोर यांनी उत्कृष्ट खेळ केला. या संघाला क्रीडाशिक्षक महेश नलावडे व पवित्रा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे, विश्वस्त डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक व्यवस्थापक समीर जेऊरकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.