फुटबॉल स्पर्धेत पाचोरा संघ उपविजेता

0

पाचोरा। येथील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था, संचलित न्यु इंग्लिश मेडीयम स्कुल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जळगाव येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय आणि मनपा क्रिडा फुटबॉल स्पर्धेत सलग दोन विजयानंतर अंतिम स्पर्धेत उपविजेतेपद पटकविले. सलग सामने जिंकल्यानंतर संघाची कामगिरी उंचावली होती. अंतिम सामन्यात धडक मारुन त्यांनी शानबाग विद्यालयास झुंजविले.

अंतिम सामना शानबाग विद्यालय या संघासोबत झाला होता. विद्यार्थ्यांच्या या यशात क्रिडा शिक्षक सुर्यकांत देवराज, प्राचार्य संजय महापात्र, व्यवस्थापक अतुल चित्ते, संदीप बिर्‍हाडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जिवन जैन, लालचंद केसवाणी, रितेश ललवाणी आदींनी कौतुक व अभिनंदन केले आहे.