फुटलेल्या पाईपलाईनमध्ये गटारीचे पाणी; नागरीकांचे आरोग्य धोक्यात

0

चाळीसगाव । आनंदवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी रिसर्च सेंटर येथे नागरिकांच्या समस्या संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत परिसराकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आनंदवाडी या परिसरात डेंग्यू, मलेरिया, हिवताप या सारखे व इतर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या गटारींचा निचरा व ज्या पुलाजवळच्या पाईपलाईन मधून जातो तो पाईप फुटल्याने गटारीत घाण जशीच्या तशीच असते. यामुळे भविष्यात या गटारीत पडून या ठिकाणी एखाद्या बालकाचा पडून मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपालिकेने दखल न घेतल्यास तहसीलवर मोर्चा
या भागात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन उघडी असून त्यात घाण पाणी साचून लोकांचे आरोग्य बिघडते व ते पाणी पिल्यामुळे कॉलरा, मलेरिया, डेंग्यू सारखे रोग उद्भवतात आनंदवाडी परिसरातील लोकांची अवस्था ही अत्यंत बिकट असून त्या परिसरात आरोग्याच्या तीव्र समस्या निर्माण झाल्या आहे, म्हणून आनंदवाडी परिसरातील लोक आता आंदोलनाच्या तयारीत आहे. आंदवाडीच्या नागरी समस्यात बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चा माध्यमातून 3 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता चाळीसगाव तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन करणार आहे. नगरपालिकेने या समस्यांची दखल न घेतल्यास नगरपलिकेवर धडक मोर्चा नेणार आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रा.डॉ.राजश्री पगारे (नाशिक), पत्रकार किसन जोर्वेकर, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेशवर राठोड, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, मुकेश नेतकर, संदीप गरुड, गौतम जाधव, कमलबाई कुर्‍हाडे, आलकबाई कदम, रमाबाई जाधव, अनिता जाधव, रवींद्र निकम, बंटी पाटील, प्रा. गौतम निकम व इतर बैठकीला उपस्थित होते.