जळगाव– शहरातील गरजू नागरिकांना पार्सल घेऊन जाण्यासाठी आठ हॉटेलांना फक्त पार्सल सुविधा वितरित करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 मार्च पर्यंत शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट खानावळ ठिकाणे गर्दी होऊ नये म्हणून बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दरम्यान उपाय योजनांचा भाग म्हणून शहरातील आठ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांना केवळ पार्सलची सुविधा वितरित करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांनी दिली आहे. या परवानगी देण्यात आलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मधून नागरिकांना केवळ फुड पार्सल नेता येणार आहे. याठिकाणी गर्दी होऊ नये याची जबाबदारी संबंधित हॉटेल चालक व मालक यांनी घ्यावयाची आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
असे आहेत आठ हॉटेल
हॉटेल सिल्वर पॅलेस, होटेल मुरली मनोहर, हॉटेल शालीमार, हॉटेल गौरव, हॉटेल जलसा, हॉटेल रसिका मुरलीमनोहर रेस्टॉरंट, हॉटेल उत्तम भोज अशा आठ ठिकाणाहून फुड पार्सल नागरिकांना उपलब्ध होणार आहे.