फुरसुंगी ग्रामपंचायतीत कचरागाड्यांची खरेदी

0

फुरसुंगी – रहिवाश्यांच्या आरोग्यास प्राधान्य देत कचर्‍याची तात्काळ विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतीच 4 कचरा घंटागाडी व एका ड्रेनेज चोकअप वाहनांची खरेदी करण्यात आली. या वाहनांचे पूजन फुरसुंगीच्या सरपंच सुधा हरपळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शंकर हरपळे, दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, प्रवीण कामठे, रोहिणी राऊत, रणजीत रासकर, मच्छिंद्र कामठे, अमोल हरपळे उपस्थित होते. वाढणार्‍या लोकसंख्येमुळे फुरसुंगीकडे असणार्‍या कचरागाड्या कचरा उचलण्यास कमी पडत असल्याने या गाड्या खरेदी करण्यात आल्याचे यावेळी सरपंच हरपळे यांनी सांगितले.