वरणगाव : वरणगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेगेट क्रमांक तीनजवळ भुसावळकडून नागपूरकडे जाणार्या कुठल्यातरी धावत्या रेल्वेच्या धडकेने फुलगावच्या 67 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाश बाबूराव पाटील (67, फुलगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे. प्रकाश पाटील हे गुरुवारी दुपारच्या वेळेस तीन नंबर गेटजवळून रेल्वे लाईन ओलांडत असतांना भुसावळकडून नागपूरकडे जाणार्या धावत्या रेल्वेने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत वृद्धाच्या पश्चात मुलगा, सून असा परीवार आहे. तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र तायडे, मनोहर पाटील करीत आहेत.