फुलगावसह चार गावांचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांना यश

वरणगाव- कठोरा खूर्द , कठोरा बुद्रूक, अंजनसोडे , फुलगाव या चार गावांचा सामूहिक पाणीपुरवठा ग्रामपंचायतींनी थकबाकी न भरल्याने गेल्या तीन दिवसांपासून खंडीत करण्यात आला होता मात्र चारही ग्रामपंचायतीने माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेवून व्यथा मांडल्यानंतर खडसे यांनी जिल्हा परीषद विभागाचे मुख्याधिकारी व जळगाव जिल्हा वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले. माजी जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र चौधरी, फुलगांव सरपंच वैशाली टाकोले, उपसरपंच राजकुमार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, चारही गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकर्‍यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आभार मानले आहेत.

टप्प्या-टप्प्याने थकबाकी भरणार -नाथाभाऊ
चार गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीकांचे पाण्यासाठी हाल होत होते. या संदर्भात जिल्हा परीषदेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून टप्प्या-टप्प्याने ग्रामपंचायती थकबाकी भरतील, असे सांगितले व वीजपुरवठा पूर्ववत जोडणी करून देण्याचे सांगितले आहे. गुरुवारपर्यंत या भागात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.