वरणगाव । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयांतर्गत सन 2017-2018 कार्यानुभव कार्यक्रमासाठी कृषिदूत फुलगाव येथील ग्रामपंचायतमध्ये शुक्रवार 30 रोजी दुपारी दाखल झाले. यावेळी सरपंच ललिता महाजन, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार चौधरी, माजी सभापती राजेंद्र चौधरी, ग्रामसेवक के.ए. भंगाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकर्यांना करणार मार्गदर्शन
कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी फुलगाव येथे चार महिने राहून शेती परिसराचा अभ्यास करून ग्रामस्थांना शेतीबाबत विविध विषयांवर माहिती देणार आहे.