वरणगाव । भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे वारंवार पाण्याबाबत तक्रारी होत असल्याने जागतीक माहिला दिनानिमित्त फुलगाव माहिलांनी चर्चा समर्थ राममंदिरात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 300 महिलांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात फुलगावची पाणीपट्टी वाढ व वारंवार पाणीपुरवठा खंडीत याबाबत चर्चा करण्यात आली. गावातील सरपंच व पुढार्यांनी याबाबत लवकर उपाययोजना करण्याचे यावेळी महिलांनी सांगीतले.
300 महिलांचा होता सहभाग
यावेळी चर्चासत्रात भारती चौधरी, सोनाली फुलगावकर, निर्मला महाजन, मालती बाऊस्कर, कमलबाई कुरकुरे, लताबाई कोलते, शैला पाटील, दामिनी पाटील, काशिबाई पाटील, निर्मला कुरकुरे, लता पाटील, निर्मला पाटील आदी 300 महिला उपस्थित होत्या.