चिंबळी : खेड तालुक्यात दक्षिण भागातील मरकळ, सोळू परिसरातील शेतकरी वर्गाची फुलशेती करण्यासाठी बाराही महिने लगबग असते.सध्या लग्न समारंभ व रामनवमी निमित्त फुलाचे भाव वाढल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाले असुन मंजुराची टंचाई असतांना स्व:ता फुलाची तोडणी करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून शेतात तोडणीसाठी जात आहेत.
गेल्या एक ते दिड महिन्यापूर्वी सोळू, मरकळ, चिंबळीे, डुडूळगांव भागातील लावलेल्या बिजलीच्या फुल पिक कडक उन्हामुळे सुकू लागले आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊ लागले आहे.