फुलराणीचा इंडोनेशियनमध्ये विजय

0

नवी दिल्ली। इंडोनेशियन ओपन स्पर्धेत भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॅटमिटनपटू सायना नेहवालने पहिला सामन्यात मोठ्या धडाक्यात सरुवात केली आहे. सायनाने आपल्या सलामीच्या सामन्यात थायलंडच्या रॅचनॉक इंटॅनोनचा 17-21, 21-18, 21-12 अशा सेट्समध्ये पराभव केला.

सायना आणि इंटॅनोनमध्ये पहिल्या सेटदरम्यान कडवी टक्कर सुरु होती. पहिल्या सेटमध्येही सायनाने आघाडी घेतली होती, पण तिला इंटॅनोनने कडवी टक्कर देत पहिला सेट आपल्या बाजूने झुकवला. स्मॅश फटक्यांचा वापर करत थायलंडच्या खेळाडूने पहिला सेट 17-21 असा आपल्या खिशात घातला. परंतु दुसर्‍या सेटपासून सायना नेहवालने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत इंटॅनोनला डोके वर काढायची संधीच दिली नाही. दुसर्‍या आणि तिसर्‍या सेटमध्ये सायनाने घेतलेली 4 ते 5 गुणांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली.